![]()
तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा स्थानिक जे. ई. स्कूलमध्ये उत्साही वातावरणात पार पडला. तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत जे. ई. स्कूलची विद्यार्थिनी देवश्री विकास पाटील हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एम. चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी वसंतराव मोरे व विषयतज्ज्ञ महेंद्र मालवेकर उपस्थित होते. तसेच तालुका विज्ञान सहसमन्वयक तथा अध्यक्ष सी. डी. पाटील, सचिव अर्चना देशमुख, सहसचिव सचिन ठाकूर, भुसावळ पतपेढी सदस्य दीपक गुळवे यांच्यासह विज्ञान शिक्षक उपस्थित होते. या वर्षी विज्ञान मेळाव्यासाठी ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र : २०४७ चे भवितव्य आणि आव्हाने’ हा विषय ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील संधी, आव्हाने, ऊर्जेचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक वैज्ञानिक उपायांवर अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या देवश्री पाटील हिला विज्ञान शिक्षिका अर्चना झांबरे व तिलोत्तमा ढाके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व देवश्रीचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. तसेच पुढील स्पर्धेबाबत माहिती दिली.
Source link
मुक्ताईनगर तालुकास्तर विज्ञान मेळावा:जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी देवश्री पाटीलची निवड; मान्यवरांनी केला सत्कार