Headlines

लासलगाव:निफाड विठाई पोदार लर्न स्कूलला 128 पदकांसह सांघिक अजिंक्यपद




नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय ग्रॅपलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मातोश्री विठाई पोदार लर्न स्कूल, निफाडच्या १२८ खेळाडूंनी तब्बल १२८ पदकांची कमाई करत सांघिक अजिंक्यपदाचा प्रथम क्रमांक पटकावला. खेळाडूंनी ७० सुवर्ण, ३० रौप्य आणि २८ कांस्यपदके मिळवत स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. स्पर्धेत विद्यालयाच्या प्रत्येक खेळाडूने जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले. वैयक्तिक कामगिरीसोबतच सांघिक कामगिरीतही सातत्य राखत खेळाडूंनी विद्यालयाच्या क्रीडा संस्कृतीची ताकद अधोरेखित केली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर विद्यालयातील अनेक खेळाडूंची राज्यस्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत तसेच विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अक्षय आंबेकर यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विजयी खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन चेतन पानसरे, आरती पानसरे आणि मुख्याध्यापिका प्रेरणा कुप्पणट्टी यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचे कौतूक केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे. या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *