Headlines

पाय धुऊन पाणी पिणे ही अंधश्रद्धा नाही, तर श्रद्धा:पुण्यात आध्यात्मिक गुरू उमेश तांगुडेचा अजब खुलासा




आध्यात्मिक गुरू उमेश तांगुडे यांनी आपल्या अनुयायांकडून पाय धुऊन घेतल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना, ‘मी कोणत्याही महिला किंवा पुरुषाला माझे पाय धुऊन त्याचे पाणी प्या, असे कधीही सांगितलेले नाही. ही लोकांची श्रद्धा आहे,’ असा अजब खुलासा केला आहे. तांगुडे म्हणाले, ‘मराठीत एक म्हण आहे की, ‘माझ्या गुरूचे माझ्यावर इतके उपकार आहेत की, माझ्या गुरूचे पाय धुऊन मी पाणी प्यायले.’ नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. त्या वेळी मी माझ्या गुरूंकडे जाऊन त्यांचे पाय धुऊन त्याचे पाणी प्यायले. त्याच दिवशी मी घरी असताना माझ्यावर श्रद्धा असलेले अनेक जण मला भेटण्यासाठी आले. त्यांनी माझे पाय धुऊन पाणी प्यायले. मात्र, या प्रकाराला मी विरोध केला होता.’ सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या प्रकारच्या चित्रफितींवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘या प्रकारच्या चित्रफितींच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. मी स्वतः कुणालाही अशा प्रकारे पाय धुऊन पाणी पिण्यास सांगितलेले नाही,’ असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची चर्चा जोरात सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *