Headlines

तिरंगा रॅली:एनसीसीच्या विद्यार्थिनींचा ‘हर घर तिरंगा’ रॅलीतून देशभक्तीचा संदेश




श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशभक्तीपर रॅली काढण्यात आली. ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकास शर्मा यांच्या मार्गदर्शनात, अध्यक्ष दिलीपराज गोयनका व प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला. श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस युनिट, एलआरटी महाविद्यालयाचे एनसीसी युनिट व आरडीजी पब्लिक स्कूलच्या एनसीसी युनिटच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर घर तिरंगा’ आदी घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीमध्ये सुमारे २५० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मुजुमदार, डॉ. निभा उपाध्याय, डॉ. पाटील, डॉ. नितनवरे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यशस्वितेसाठी एनसीसी अधिकारी कॅ. डॉ. श्वेता मेंढे, एनएसएस अधिकारी डॉ. सुमेघ सगने, एलआरटी महाविद्यालयाचे कॅ. डॉ. अनिल तिरकर, आरडीजी पब्लिक स्कूलचे भूषण पाटील, डॉ. विजय आळशी, डॉ. स्मिता देवर, आदींचे विशेष सहकार्य लाभले. प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून राष्ट्रप्रेम व्यक्त करावे आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी भावनेला बळ द्यावे, असा संदेश रॅलीद्वारे देण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे नागरिकांमध्येही राष्ट्रप्रेम व देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *