राज्यात गेल्या 48 तासांपासून पावसाच्या सरी कोसळत असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता ‘डिप्रेशन’मध्ये (तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) रूपांतर झाले आहे. हे डिप्रेशन सध्या झारखंड आणि छत्तीसगडच्या परिसरात सरकले असले, तरी त्याच
.
पावसाची सद्य:स्थिती आणि हवामान प्रणाली
कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन)
बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन सध्या झारखंडच्या रांची आणि छत्तीसगडच्या आंबिकापूर परिसरात सक्रिय आहे. ही प्रणाली हळूहळू पुढे सरकत असून, पुढील 6 ते 8 तासांत तिची तीव्रता ओसरण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या या प्रणालीमुळे वाहणारे वारे महाराष्ट्राच्या (विशेषतः विदर्भाच्या) दिशेने येत असल्याने पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
नैऋत्य मोसमी वारे
बंगालच्या उपसागरातील प्रणालीसोबतच अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारेही (South-West Winds) सक्रिय झाले आहेत. याचा थेट परिणाम मध्य महाराष्ट्रावर होत असून, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राजस्थानपासून गुजरात ते अरबी समुद्रापर्यंतही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
15 ऑगस्ट कुठे पडणार पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील.
येलो अलर्ट: पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, भंडारा आणि गोंदिया
विजांसह वादळी पावसाचा इशारा : संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज असून बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
16 ऑगस्ट पावसाचा अंदाज
रविवारीही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांसाठी रविवारीही ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, रायगड आणि साताऱ्याच्या घाट परिसरासाठी रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने तिथेही ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांतील राज्यातील तापमानाची स्थिती
शुक्रवारी (14 ऑगस्ट) सकाळपर्यंतच्या 24 तासांत राज्यातील सर्वाधिक तापमान 34.2 अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे नोंदवले गेले. तर, सर्वांत नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे 17.5 अंश सेल्सिअस इतके होते. तसेच, घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक जोर विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पाहायला मिळणार आहे. शहरी भागांसाठी कोणताही मोठा अलर्ट नसला, तरी घाट परिसर आणि विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हेही वाचा…
तुकाराम मुंढेंचा धडाका:10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA ची धाड; 12 परवाने निलंबित

अवघ्या 10 मिनिटांत घरपोच किराणा सामान आणि खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, या सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या ‘डार्क स्टोअर्स’मधून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आता एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात Blinkit, Zepto आणि Instamart या प्रमुख कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सवर अचानक धाडसत्र राबवण्यात आले. या कारवाईत थेट 12 डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी