![]()
पुणे महानगरपालिकेतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सव, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, जलसंवर्धन आणि धार्मिक अशा विविध क्षेत्रांत त्यांनी चार दशकांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे महापालिकेच्या मुख्य भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. महेश सूर्यवंशी यांनी १९८४ मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाद्वारे गणेशोत्सवात सक्रिय सहभागास सुरुवात केली. २००१ मध्ये ते ट्रस्टच्या विश्वस्तपदी नियुक्त झाले, तर २०१० पासून ते कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य, जलसंवर्धन, पर्यावरण आणि ग्रामविकास यांसारख्या क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवले आहेत. निसर्ग संवर्धन अभियानांतर्गत वृक्षारोपण, तरुणांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि विविध धार्मिक उपक्रमांनाही त्यांनी चालना दिली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुणे शहराचे ब्रँडिंग व्हावे, पर्यटन वाढावे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. गणेश मंडळांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी ‘जय गणेश व्यासपीठ’ स्थापन करण्यातही पुढाकार घेतला. सार्वजनिक विश्वस्त संस्था केवळ सत्ताकेंद्र न राहता मानवसेवेची केंद्रे व्हावीत, हा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेने केलेला हा गौरव त्यांच्या दीर्घकालीन सेवेची पावती आहे. ‘वन्द्य वंदे मातरम्’मधून देशभक्ती आणि लोकसंस्कृतीचा जागर ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने व निनादाने दुमदुमलेला परिसर, रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा दिलेला संदेश, ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून जवानांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता, मल्लखांब, लाठी-काठी व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकातून दिसलेली भारतीय परंपरेची आणि लोकसंस्कृतीची झलक आणि स्वातंत्र्यवीरांच्या जीवनगौरवाच्या प्रदर्शनीतून जागवलेली राष्ट्रभक्तीची भावना, अशा विविध उपक्रमांनी टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारून गेला. भारताच्या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘वन्द्य वंदे मातरम् मेळा देशभक्तीचा’ या कार्यक्रमाला पुणेकर, विद्यार्थी आणि तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. देशभक्ती, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम या मेळ्यात पहायला मिळाला. शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे, पवित्रम् फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके व उपाध्यक्ष गजेंद्र पवार,शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर, उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आणि अध्यक्ष तुषार कुलकर्णी, सदस्य आणि स.प. महाविद्यालय विनाअनुदानित विभागाचे अध्यक्ष पराग ठाकूर, मंडळाच्या सचिव रमा कुलकर्णी, तसेच ‘वन्द्य वंदे मातरम्’ मेळा देशभक्तीचे समन्वयक व प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील उपस्थित होते.
Source link
महेश सूर्यवंशींचा पुणे महापालिकेतर्फे सन्मान:दगडूशेठ ट्रस्टचे कोषाध्यक्ष, चार दशके सामाजिक सेवेत सक्रिय