Headlines

हाफकिन संस्थेची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा:राज्यमंत्री योगेश कदम यांनी पिंपरी येथील कामकाजाचा घेतला आढावा




राज्यमंत्री योगेश कदम यांनी पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. कदम यांनी उत्पादन विभाग, सर्पालय, अश्व संवर्धन विभाग आणि अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी केली. त्यांनी अँटी-स्नेक व्हेनम सीरमचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला, तसेच राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार किट उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. हाफकिनच्या प्रलंबित निधीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले. या निधीसाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. संस्थेच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येणार आहे. हाफकिन संस्थेकडे असलेली क्षमता, प्रदीर्घ अनुभव आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हुकरे, हाफकिनचे महाव्यवस्थापक धीवर, पिंपरी विभाग व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुरहे यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन पावसाचे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे, मातीचे संवर्धन करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध जनजागृती, शैक्षणिक आणि प्रत्यक्ष जलसंधारणाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिना’निमित्त ‘महा वॉकेथॉन–जलासाठी चालूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा या उपक्रमाचा मुख्य संदेश असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संकल्पनेतून नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जागृती करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *