Headlines

म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा:रस्ते, ड्रेनेज कामांना गती देण्यासाठी पाटील यांच्या सूचना




उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हाळुंगे गावातील रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनच्या समस्यांची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे या कामांना गती मिळणार आहे. म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. ऑर्चिड हॉटेल ते व्ही.टी.पी. बांधकाम प्रकल्पापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, ड्रेनेज लाईन आणि पावसाळी पाण्याच्या लाईन टाकण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामस्थांनी आपल्या विविध अडचणींबाबत सविस्तर निवेदनही सादर केले. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी तात्काळ पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी संबंधित रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडवण्याचे आदेशही त्यांनी दिले. म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता या कामांना गती मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी भाजप नेते गणेश कळमकर, माजी सरपंच रेखा पाडळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, उद्योजक सोपानराव पाडळे, सुरेश पाडळे, सचिन पाडळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मनोज सेठिया यांची पिंपरी चिंचवड शहर अभियंतापदी पदोन्नती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सह शहर अभियंता (स्थापत्य) मनोज मोतीलाल सेठिया यांना ‘शहर अभियंता’ पदावर सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे. महापालिका आस्थापनेवरील ‘शहर अभियंता’ पद दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रिक्त झाले होते. या पदावरील पदोन्नतीसाठी दिनांक १८ जून २०२६ रोजी पदोन्नती समितीची सभा घेण्यात आली. समितीने शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व तसेच शिस्तभंगविषयक बाबींची पडताळणी करून सेठिया यांच्या पदोन्नतीची शिफारस केली.महापालिका सभा ठराव क्र. ४४, दिनांक २७ जानेवारी २०२६ अन्वयेही त्यांच्या पदोन्नतीस मान्यता देण्यात आली आहे. ही पदोन्नती संबंधित न्यायालयीन प्रकरणे, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका तसेच संबंधित शासन निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित रिट याचिकांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आली आहे. शहर अभियंता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील विकासकामांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम दिशा मिळण्यास तसेच स्थापत्यविषयक कामकाजात प्रभावी समन्वय साधण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *