![]()
शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ग्रामसेवकांची राज्य संघटना आक्रमक झाल्याने १७ ऑगस्टला मध्यरात्री ६ ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी ग्रामसेवक संघटनेचे शेकडो पदाधिकारी सकाळपासून पंचायत समिती आवारात हजर झाले. पंचायत समिती व पोलिस ठाण्याच्या आवारात ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. १७ ऑगस्टला ग्रामसभेतील हुल्लडबाजीमुळे ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या छातीत दुखू लागले आणि अधिक उपचारासाठी धुळे येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. बेपर्वाईमुळे मृत्यूचा आरोप राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीव निकम यांनी, हा मृत्यू प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे झाल्याचा आरोप केला. संपूर्ण राज्यात ग्रामसभा बंद करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला असून, याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.
Source link
ग्रामसेवकाच्या मृत्युप्रकरणी 6 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल:पारोळ्यामध्ये ग्रामसेवक संघटना आक्रमक