Headlines

सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव:संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले- संविधान आणि न्यायाचाच विजय होईल




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळण्यामागे हजारो कोटींचा व्यवहार झाला असून, यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दलाली केल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. “हेच खरे ‘बौद्धिक नक्षलवादी'”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या ‘बौद्धिक नक्षलवादी’ या शब्दाचा संदर्भ देत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. ते म्हणाले, “खरे बौद्धिक नक्षलवादी हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष आहेत. ज्यांनी बेकायदेशीर निर्णय देऊन संविधान गाडले, ज्यांनी विधिमंडळातील फूट हीच पक्षातली फूट मानून पक्ष विकला, ते खरे बौद्धिक नक्षलवादी आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय घेतले आहेत.” अमित शाहांवर ‘दलाली’चा आरोप शिंदे गटाला मिळालेल्या पक्ष आणि चिन्हावर बोलताना राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. “निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला विकले. मी थेट सांगतोय, निवडणूक आयोग विकत घेतला गेला आहे. यात हजारो कोटींचा व्यवहार झाला असून त्यामध्ये दलालीचे काम अमित शाह यांनी केले आहे, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा डाव सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत राऊत यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचे कौतुक केले. “कपिल सिब्बल यांनी उत्तम युक्तिवाद केला. हा निकाल आधी द्या, पुढची गाडी आपोआप सुरळीत होईल. सध्या एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या विधानांवरून असे दिसते की, सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, सुप्रीम कोर्टात संविधानाचा आणि न्यायाचाच विजय होईल,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. अमृता फडणवीसांना टोला राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे महान सेवक आहेत. ‘जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही,’ असे त्यांचे एक वक्तव्य मला आठवते. त्यामुळे मी अमृता फडणवीस यांच्या भावना समजू शकतो. पण शेवटी मोदी आणि राष्ट्र प्रथम आहे. अनेकांनी राष्ट्रसेवेसाठी त्याग केला आहे, तसा वहिनीसाहेबांनीही करावा. त्यांना फक्त मुंबईच्या बंगल्यातून दिल्लीच्या मोठ्या बंगल्यात जायचे आहे, त्यामुळे त्यांनी आता तशी मानसिकता तयार केली पाहिजे.” हेही वाचा.. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली: गृहमंत्री शब्दांचे खेळ करून मूळ मुद्द्यावरून लक्ष वळवतात, पोलिस फक्त व्हीआयपींच्या सुरक्षेत व्यस्त- रोहित पवार जुन्नरमध्ये जी अत्याचाराची घटना घडली आहे, ती सत्ताधारी स्थानिक आमदारांच्या गावात घडली आहे. त्यांच्या गावातच जर अशा घटना घडत असतील, तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किती खालावली आहे हेच यातून सिद्ध होत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सविस्तर वाचा जुन्नर हादरले:पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *