Headlines

जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र:पावसाच्या अर्धवट नोंदीचा बसतो फटका, पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्याबरोबर योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी‎



अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. माळरानावरील खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जिल्ह्यात असमान पाऊस पडतो. पावसाची नोंद मंडळनिहाय होते. मंडळात असलेल्या काही गावांमध्ये मोठा पाऊस तर काही ठिकाणी कोरडेठाक हवामान असते. जिल्ह्यातील १०३३ ग्

.

त्यामुळे योग्य पद्धतीने पावसाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा, पीक विम्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. प्रत्यक्ष पडलेला पाऊस आणि दप्तरी नोंदी यात पर्जन्यमापकांची संख्या कमी असल्याने विसंगती येत असल्याने अडचण होत आहे. ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील इतर दहा तालुक्यांपेक्षा मंगळवेढ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, मारापूर ,मंगळवेढा या मंडळामध्ये केवळ दोन मोठे पाऊस झाल्याची नोंद प्रशासकीय कामकाजात केली आहे.

शासनाच्या वतीने तालुक्यातील ७ महसुली मंडळात प्रत्येक ठिकाणी एक पर्जन्यमापक बसवले आहे. यावरच ८१ गावांच्या पावसाची नोंद होते. त्यावरून त्या मंडळातील पावसाचे प्रमाण ठरवले जाते. मंडळात सर्वत्र सारखा पाऊस पडत नाही. असे असले तरी ज्या ठिकाणी पर्जन्यमापक बसवले आहे त्या ठिकाणचीच नोंदणी होत असल्याने इतर महसूल मंडळातील गावांना त्याचा नाहक फटका बसत आहे. एका महसूल मंडळात पडलेल्या पावसाची नोंद इतर गावावर पडलेल्या पावसाच्या प्रमाणावर व त्या गावात पर्जन्यमापकाने घेतलेल्या नोंदीवर अवलंबून असल्याने अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यात ७ महसूल मंडळ आहेत त्यामध्ये मंगळवेढा, आंधळगाव, मारापूर, मरवडे, भोसे, हुलजंती, बोराळे यांचा समावेश होतो. मंगळवेढा मंडलात १४ गावे आहेत. मरवडे मंडळ १२, आंधळगाव मंडळ १०, मारापूर मंडळ १२, हुलजंती मंडळ १२, बोराळे मंडळ १० गावे अशा एकूण ८१ गावांत फक्त ७ पर्जन्यमापकाद्वारे पावसाची नोंदणी केली जाते.

पूर्ण तालुक्यात पाऊस पडला असे सांगितले जाते. शासनाने प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत स्वयंचलित पर्जन्यमान मोजण्याचे मशीन बसवण्याचे धोरण निश्चित केले आहे. पर्जन्यमापक यंत्र बसवण्यासाठी जागा निश्चित नव्हत्या, आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नतून जागा निश्चित केल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीवर पर्जन्यमापक यंत्र बसवणार आहे. प्रत्येक गावाची नोंद होईल.- मनीषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी, मंगळवेढा

गावोगावीपर्जन्यमापक उभारणार, जागा निश्चित केल्या जात आहेत

गावस्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची तयारी सुरू आहे. काही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने काम सुरू करण्यासाठी अडचणी येत असून प्रक्रिया सुरू आहे, पावसाचे स्वरूप अनिश्चित आहे. काही गावात पडतो काही गावात पडत नाही. एकाच गावात एका भागात पडतो दुसऱ्या ठिकाणी पडत नाही. अचूकता येण्यासाठी गावनिहाय यंत्रे बसवणे आवश्यक आहे. काही दिवसात सर्व गावात बसवणार.

शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधिकारी, सोलापूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *