Headlines

दिंडी मार्गाची दुरवस्था; संभाजी ब्रिगेडने केले श्रद्धांजली आंदोलन:56 दिवसातच पडले खड्डे; अपघातांचे प्रमाण वाढल्याचा केला आरोप‎




शेगाव दिंडी मार्गाचे काम जून महिन्यात झाले. मात्र आता या मार्गावर खड्डे पडले असून, संभाजी ब्रिगेडने या रोडवर श्रद्धांजली आंदोलन करत सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले. हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत शेगाव पालखी मार्गाचे काम २०१९ मध्ये मंजूर झाले. शेगाव- नागझरी- पारस- निमकर्दा- गायगाव- अकोला- गोरेगाव- माझोड- वाडेगाव- मेडशी- ब्राम्हणवाडा देवा- रिसोड- लोणी आणि बीबी ते किनगाव जट्टू असे ८२ कि.मी.चे काम आहे. १८ जून रोजी तयार झालेला रस्ता १८ ऑगस्टपर्यंत खड्डेमय झाला असून या खड्डेमय रस्त्यामुळे दिंडी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. अकोला येथून शेगाव येथे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग म्हणून या मार्गावरून भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शनिवारी रात्री तर या मार्गावरून हजारो भक्त पायी यात्रा करतात. मात्र या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष रवी गावंडे, आझाद फाउंडेशनचे गोपाल पोहरे, महानगराध्यक्ष योगेश ढोरे, देवा गावंडे, पंकज बाजोड, तालुकाध्यक्ष विष्णू अरबट, राम निंबेकर, हर्षल धांडे, पीयूष पवार, अभिषेक साबळे, ऋषिकेश साबळे, अंकित देवरे, संजय मगर, वसंत कोकाटे आदी ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थ रस्त्यावर : शेगाव- पंढरपूर दिंडी मार्गावरील कसुरा ते पारस रेल्वे गेटपर्यंतचे कामासाठीही सार्वजनिक बांधकाम िवभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. हा मार्ग सुमारे १० वर्षांपासून रखडला असून, कामासाठी राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलने केली. आता ग्रामस्थही रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अशी वाढली किंमत : शेगाव- नागझरी- पारस- निमकर्दा- गायगाव- अकोला- गोरेगाव- माझोड- वाडेगाव- मेडशी- ब्राम्हण वाडा देवा- रिसोड- लोणी आिण बीबी ते किनगाव जट्टू असे ८२ कि.मी.चे काम आहे. प्रथम १८ ऑगस्ट २०१७मध्ये (२८४ कोटी ४९ लाख) तांत्रिक मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०१९मध्ये कामासाठीचा ३७१ कोटींचा करार करण्यात आला. कामाला प्रारंभही झाला. शेगाव ते गायगावपर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आला. कामानुसार वेळोवेळी देयक अदा करण्यात आले. मात्र नंतर मार्च २०२०मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने काम बंद होते. २०२१मध्ये कंत्राटदार बदलण्यात आले. मात्र अद्यापही यासंपूर्ण मार्गाचे काम पूर्ण झालेले नसून, धुळीचा त्रास नागरिकांना सहन करतच प्रवास करावा लागत आहे. तीस ते चाळीस खड्डे निमकर्दा गावाच्या बाहेर अर्धा किलोमीटर रस्ता तयार करण्यात आला. या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरात तीस ते चाळीस गड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे सध्या स्थितीत हा मार्ग एकेरीस बनवण्यात आल्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *