Headlines

छत्रपती संभाजीनगर-बीडमध्ये बनावट GST नोंदणीचा संशय:अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, 200 तक्रारींच्या चौकशीची मागणी




बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे GST नोंदणी, बोगस बिलिंग आणि पात्रता नसतानाही इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याच्या संशयावरून आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सरकारी महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत दानवे यांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. दानवे यांनी ९ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, त्याची प्रत राज्य कर आयुक्त तसेच केंद्रीय GST विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्तांनाही दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बनावट किंवा संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे काही व्यक्ती अथवा संस्थांनी GST नोंदणी मिळवून प्रत्यक्षात वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता करचलने जारी केली असण्याचा संशय आहे. अशा व्यवहारांच्या माध्यमातून पात्रता नसलेला ITC घेतला किंवा पुढे हस्तांतरित केला गेला असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. बीड आणि संभाजीनगरमधील तीन संस्थांकडे विशेष लक्ष दानवे यांनी पत्रात प्राथमिक चौकशीसाठी तीन संस्थांचा उल्लेख केला आहे. त्यात साई ट्रेडिंग (बीड), आनंद ट्रेकॉम प्रा. लि. (छत्रपती संभाजीनगर) आणि ज्योती ट्रेडर्स (बीड) यांचा समावेश आहे. या संस्थांच्या GST नोंदणीपासून ते प्रत्यक्ष व्यवहारापर्यंतची माहिती तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. GST नोंदणी करताना सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता, संबंधित व्यवसायाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी, GST रिटर्न, ई-वे बिल, करचलने, ITC व्यवहार, बँक व्यवहार आणि लेखा नोंदी तपासाव्यात, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. बोगस बिलिंगमागील साखळी शोधण्याची मागणी प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता बनावट करचलने तयार करण्यात आली आहेत का, तसेच पात्रता नसलेला किंवा फसवणुकीच्या माध्यमातून मिळवलेला ITC इतर संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे का, याचीही चौकशी करावी, असे दानवे यांनी म्हटले आहे. याशिवाय या व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या शेल कंपन्या, मध्यस्थ, दलाल, अकाउंटंट आणि अन्य लाभार्थींची भूमिका तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गेल्या सहा महिन्यांत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्यानंतर GST नोंदणी रद्द झालेल्या संस्थांचीही तपासणी करण्याची सूचना त्यांनी केली आहे. GST पोर्टलवरील डिजिटल नोंदी तपासण्याची मागणी संशयास्पद व्यवहारांची डिजिटल पातळीवरही छाननी करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. GST पोर्टलवरील संबंधित नोंदी, सिस्टम लॉग आणि व्यवहारांचा तपशील तांत्रिक पद्धतीने तपासावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. करचुकवेगिरी किंवा आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधितांवर CGST Act, MGST Act, भारतीय न्याय संहिता आणि अन्य लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी. तसेच शासनाचा महसूल व्याज आणि दंडासह वसूल करावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची मागणी GST नोंदणी मिळवून देण्यासाठी किंवा नियमबाह्य व्यवहारांना मदत करण्यासाठी कोणत्याही सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची भूमिका आढळल्यास त्यांच्यावरही शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी आपल्या पत्रात ही एक तक्रार असून अशाच प्रकारच्या सुमारे २०० तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ काही संस्थांपुरते मर्यादित न ठेवता व्यापक पातळीवर तपासण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महसूल नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या तपासाची मागणी बनावट GST नोंदणी, बोगस बिलिंग आणि चुकीच्या ITC दाव्यांमुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत दानवे यांनी संबंधित प्रकरणांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्या व्यक्ती, संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून शासनाचा महसूल पूर्णपणे वसूल करावा, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अंबादास दानवेंचे पत्र.. हेही वाचा.. राज्यात मान्सूनची विश्रांती!:पुढील 4-5 दिवस कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाही; कोकणातही पावसाचा जोर ओसरला महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. सर्वसामान्यांना मुसळधार पावसापासून दिलासा मिळाला असला, तरी ऐन मोक्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *