Headlines

सुरक्षेच्या साहित्याअभावी कामगाराचा झाला मृत्यू:दोघांविरुद्ध पैठण पोलिसांत गुन्हा दाखल‎




जायकवाडी धरण परिसरातील इसारवाडी शिवारात डीएमआयसी-बिडकीन पाइपलाइनच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा साहित्य न पुरवल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी पैठण एमआयडीसी ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकुल बाबासाहेब शेळके (३३, रा. बोरगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार विठ्ठल भानुदास अवधुत आणि दत्ता विठ्ठल अवधुत (दोघे रा. बोरगाव, ता. पैठण) यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. जगदंबा एंटरप्रायजेसच्या माध्यमातून पाइपलाइनच्या कामावर मयत रेवननाथ आबाजी बोबडे आणि इतर कामगारांना नियुक्त करण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी जॅकेट व सुरक्षा बूट यांसारखी आवश्यक साधने पुरवण्यात आली नाहीत; तसेच कामगारांचा विमादेखील उतरवला गेला नव्हता. या निष्काळजीपणामुळे २७ एप्रिल रोजी रेवननाथ बोबडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नकुल शेळके गंभीर जखमी झाले. घटनेच्या दीर्घ कालावधीनंतर, २१ ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल झाल्याने गुन्हा नोंदवण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *