Headlines

'भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची..':भाजपच्या राजवटीत अयोध्येत रामाचे मंदिर लुटण्यात आले, संजय राऊतांचा हल्लाबोल




काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे बारामती तालुक्यातील मोरगाव येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेने आयोजित केलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’त खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. या आंदोलनाला भाजपने विरोध केल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या तणावपूर्ण वातावरणातच संजय राऊत यांनी भाषण करत उपस्थित शिवसैनिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. संजय राऊत म्हणाले, तुम्ही उपस्थित आहात, रामरक्षा म्हणजे रामाचे रक्षण. अयोध्येयत भाजपच्या राजवटीत रामाचे मंदिर लुटण्यात आले. रामाचे अलंकार चोरले, सीतामाईचे मंगळसूत्र चोरले, हजारो कारसेवकांनी बलिदान दिले तेव्हा राम मंदिर उभे राहिले आहे. मात्र, अयोध्येतील या मंदिरातून 1400 कोटी रुपये चोरीला गेले आहेत, या मंदिरात CCTV लावले असताना ही चोरी झाली. ज्या रामाने सत्ता दिली त्या रामाच्या मंदिरात चोरी करताय? असा सवाल राऊत यआणि उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात रामरक्षा आंदोलन करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, इकडचे नेते सुद्धा आहेत ना त्यांना बोलवायला पाहिजे, त्या आहेत ना भाजपसोबत. पण हे सगळे ढोंगी आहेत. अयोध्येतून परत राम वनवासात जाईल अशी परिस्थिती या भाजपने तिकडे केली आहे. त्यामुळे, भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची आणि विचारायचं मंदिरात चोरी कोणी केली? असे राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंवर टीका संजय राऊत यांनी पीएम केअर फंडवरून केंद्रावर टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या अकाउंटमध्ये साडे 10 हजार कोटी रुपये आहेत, पीएम केअर फंडमध्ये हा पैसा आहे. बारामतीकरांनो जागे व्हा, खरा राम शोधा. बाळासाहेब म्हणाले होते बाबरी तोडण्यात शिवसैनिक असतील तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. रामाचे रक्षण करण्याचा खरा अधिकार आपल्याला आहे, मिंदेंच्या लोकांना नाही, असे संजय राऊतांनी म्हटले. यावेळी, शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंविरुद्ध घोषणाबाजी केली. तर, (एकनाथ शिंदे चोर है) ही घोषणा गल्ली गल्लीत गेली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. रामरक्षा आंदोलनात अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गोंधळ मोरगाव येथे ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ग्रामपंचायत सदस्या स्वाती शेरे गायकवाड यांनी अचानक घुसून मोठा गोंधळ घातला. त्यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आंदोलनात व्यत्यय आणला आणि खासदार संजय राऊत यांना थेट प्रश्न विचारण्याची आक्रमक मागणी केली. या वाढत्या तणावानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिलेला ताब्यात घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *