![]()
तालुक्यातील कानडगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत सटवाई देवीच्या मंदिराची दानपेटी उघडून त्यातील जमा रक्कम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासकामांसाठी सुपूर्द केली. येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत चार वर्गखोल्य
.
या खोल्यांची रंगरंगोटी करणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी यासाठी बोलक्या भिंती तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. शाळा प्रशासनाने लोकसहभागाचे आवाहन केले होते. ग्रामस्थांनी याला प्रतिसाद देत मंदिराची दानपेटी शाळेसाठी खुली केली . ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही दानपेटी उघडली असता त्यातून जमा झालेली २६ हजार ४०४ रुपयांची रक्कम शाळेकडे सुपूर्द केली. याप्रसंगी सरपंच अरुणाबाई वरपे, गिरीश क्षीरसागर, शिक्षिका पठाण, दादासाहेब नलावडे, सुखदेव वरपे, नानासाहेब वाघ उपस्थित होते.