Headlines

औद्योगिक परिसरात स्वतंत्र उपकेंद्र प्रस्तावित:महावितरण अन् औद्योगिक ग्राहकात संवाद बैठकीत तक्रारींचा पाऊस‎




महावितरण कंपनी आणि उद्योजकांमध्ये (औद्योगिक ग्राहक) संवाद बैठक पार पडली. औद्योगिक ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. त्यासाठी औद्योगिक वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती नियमित करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांची नवीन वीज जोडणी असेल, किंवा सरासरी व वाढीव वीजबिलासंबंधी तक्रारी असतील, तर त्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, अशी ग्वाही मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी याप्रसंगी दिली. जिल्ह्यात ऑटोमोबाईल्स, आयटी पार्कसारखे मोठे उद्योग नाहीत. कौशल्यांनुसार रोजगार, संधीच्या शोधात वऱ्हाडातील तरुणाईला मुंबई, पुणे, नाशिकसारख्या महानगरात जावे लागते. बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश घाटोळे, अजितपालसिंह दिनोरे, हेमंत पावडे, प्रविण चांभारे, अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, आशिष चंदाराणा, कमलेश अग्रवाल आदी उपस्थित होते. वीज ही विकासाची जननी आहे. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार वीज पुरवठा करण्यासोबत आगामी काळातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी औद्योगिक वसाहतीत महावितरणने नवीन उपकेंद्र प्रस्तावित केल्याचे मुख्य अभियंत्यांनी सांगितले. या उपकेंद्राच्या जागेसाठी उद्योजकांनी सकारात्मकता दाखवली. उद्योजक सकारात्मक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *