![]()
पाणी फाऊंडेशन अंतर्गत आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचे अनुषंगाने तालुक्यातील ‘माझा गट-माझे कुटूंब’ हे प्रशिक्षण घेण्यात आले. पिंपळगाव बैनाई येथे अतिशय उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रशिक्षणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो पूजनाने केली. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश गटशेती करणे का आहे. त्याचे महत्व, टीम वर्कचे महत्व आणि माझा गट हे माझे कुटुंब कसे होईल ही भावना गटामध्ये जागृत करणे तसेच स्मार्ट टीम शेती अँप वर माहिती भरणे किती महत्त्वाचे आहे. या विषयी अत्यंत सोप्या भाषेत तसेच व्हिडिओ आणि पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाला पाणी फाउंडेशन चे क्षेत्रीय अधिकारी जयकुमार सोनुले, क्षेत्रीय अधिकारी रेणुका पोहोकार, कृषी विभागाचे मेंटर प्रकाश लाडके, समूह सहाय्यक दीपाली बागडे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महात्मा फुले शेतकरी गट दाभा, माऊली कृपा शेतकरी गट कोदोरी, महात्मा फुले शेतकरी गट ढवळसरी, शेतकरी गट वेणी गणेशपूर, ग्राम कृषी क्रांती गट पुसनेर, कृषी क्रांती गट कोदोरी, कृषी समृद्धी गट पिंपळगाव बैनाई इत्यादी गटांनी सक्रिय सहभाग नोंदविला. सदर प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी कृषी समृद्धी गट पिंपळगाई बैनाई या गटाने घेतली होती. माझा गट माझे कुटूंब प्रशिक्षणाची सांगता सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटार फार्मर कप स्पर्धा प्रकाश लाडके यांनी आभार मानून केली. या वेळी शेतकरी गटाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गटांनी कायम एकत्र राहण्याचा केला संकल्प या प्रशिक्षणाची विशेषतः म्हणजे उपस्थित सर्व गटाने एकमुखाने पाणी टीम चे आभार मानले व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गट शेती चळवळीचा कायम धागा बनून राहू, असे आश्वासन दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था कृषी समृद्धी गट पिंपळगाव बैनाई यांनी केली होती.
Source link
पिंपळगाव बैनाई येथे ‘माझा गट-माझे कुटुंब’ वर प्रशिक्षण:सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचेही आयोजन, शेतकरी गटांचा सहभाग