Headlines

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला 'लिव्ह इन' महागात:पैसे द्या नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन म्हणणाऱ्या महिलेवर हिंगोलीत गुन्हा दाखल




हिंगोलीच्या भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याशी जवळीस साधून अत्याचाऱ्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बळसोंड भागातील भाजपाचे माजी पदाधिकारी आशिष वाजपेयी हे युवा विकास सोसायटी अंतर्गत शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमध्ये काम करतात. बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात काम सुरु केले होते. यामध्ये त्यांनी नांदेड जिल्ह्यातील एका महिलेची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर मागील दोन वर्षापासून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर ते लिव्ह इनमध्ये आले. या जवळीकतेचा गैरफायदा घेत त्या महिलेने आशिष यांच्याकडे सतत पैशाची मागणी सुरु केली. त्यानंतर त्यांनी महिलेस वीस लाख रुपये व पाच तोळे सोने दिले. त्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी केली जात असल्याने त्यांनी एका वेळी एक लाख, तीन लाख व सहा लाख रुपयांच्या रकमेचे धनादेश त्या महिलेला दिले. दरम्यान, त्या महिलेकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. काही दिवसांपुर्वीच तिने पैशाची मागणी केली. पैशासाठी ती महिला ता. 15 एप्रिल रोजी बळसोंड येथील घरी देखील आली होती. त्या महिलेकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून आशिष यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्या महिलेने समाजात बदनामी करेल तसेच अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे आशिष यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी त्या महिले विरुध्द ता. 17 एप्रिल रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *