Headlines

9000 Bottles Ordered from Mumbai, Pune, Delhi



हिंगोलीचा येलो गोल्ड ब्रँण्डला आता देशभरातून मागणी होऊ लागली असून पुजा महिला बचतगटाने हळदी पासून तयार केलेल्या उत्पादनांची नागरीकांनी मागणी नोंदवली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली येथील नागरीकांनी टर्मरिक शॉटस या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या तब्बल 9 ह

.

हिंगोलीच्या मातीतील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या हळदीला जागतिक दर्जाची ओळख निर्माण करत आहे. हिंदू ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राने हळदीचे संशोधन सुरु केले असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हळदीला चांगला भाव मिळावा यासाठी हळदीला भौगोलिक मानांकन मिळवून दिले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात हळदीवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करणारे महिलांचे बचतगट असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी हिंगोली येलो गोल्ड या ब्रँडखाली पूजा महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांची ब्रँण्डींग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, दिल्ली, पुणे येथे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हळदीच्या वस्तूंचे बॉक्स लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेटस्वरुपात देऊन त्यांची माहिती दिली. एवढेच नव्हे तर मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हळदीपासून तयार केलेल्या वस्तूंचे बॉक्स दिले.

या शिवाय मुंबई येथे झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये महिलांनी उत्पादीत वस्तूंची माहिती दिली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर हळदीपासून तयार केलेल्या वस्तूंना मोठी मागणी मिळाली होती. या ठिकाणी चार दिवसांतच तब्बल 10 लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता.

दरम्यान, यानंतर आता मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, नागपूर, गोवा, बेंगलुरुया ठिकाणावरून यलो गोल्ड बॉक्सची मागणी सुरु झाली आहे. या संदर्भात बचत गटाच्या वनिता दंडे यांनी सांगितले की, टर्मरिक शॉटच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध तयार केले असून त्यांची नोंदणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांची विक्री सुरु झाली असून तब्बल 9000 बॉटल्सची मागणी आली आहे. या शिवाय सौंदर्यप्रसाधनामध्ये टर्मरिक क्रिमची 1700 बॉक्स, टर्मरिक साबण 2500 बॉक्सची मागणीही नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातून बचतगटातील दहा महिलांना दररोज रोजगार उपलब्ध झाला असून बचतगटाची आर्थिक उलाढाल देखील लाखोंच्या घरात गेली आहे.

नैसर्गिक उत्पादने आरोग्यासाठी वरदान- वनीता दंडे, सदस्या पुजा महिला बचतगट

हळदीपासून बनवलेली ही नैसर्गिक उत्पादने नागरीकांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत. महिलांच्या कष्टाला आता खऱ्या अर्थाने ग्लोबल ब्रँडची ओळख मिळाली आहे. या शिवाय महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *