Headlines

चालकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 17 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना




हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे टोल प्लाझा, मेहकर नजीक आज सकाळी 5.30 मिनिटाला भीषण अपघात घडला. मोबाईलवर व्हिडिओ काढत असताना बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे लक्झरी बस पलटी होऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकल्या पियुष यशपाल राठोड याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक 17 जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, MH 29 BE 2333 क्रमांकाची लक्झरी बस चालक मोबाईलवर व्हिडिओ शूट करत होता. यावेळी त्याचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली आणि MH 40 ED 1348 क्रमांकाच्या कारला धडकली. कारमधील रूपचंद गजानन बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांना मुका मार लागला असून बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत. टोल कर्मचाऱ्यांचे धाडस; अनेकांचे प्राण वाचले अपघातानंतर समृद्धी टोल नाका, मेहकर येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी बसमध्ये घुसून जखमींना बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “वेळीच मदत मिळाली नसती तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला असता.” रुग्णालयात डॉक्टरांचा विलंब; संतापाची लाट जखमींना ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर तब्बल अर्धा तास डॉक्टर उपस्थित नसल्याची गंभीर बाब समोर आली. या दरम्यान ब्रदर व सिस्टर यांनी प्राथमिक उपचार केले, तसेच काही नागरिकांनीही मदत केली. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णालय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या शहरातील ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ व्यवस्थापन पुन्हा एकदा उघड झाले आहे. ड्युटीवरील डॉक्टर रुग्णालयात न थांबता घरी असल्याचे आरोप होत असून, रुग्ण आल्यावर त्यांना फोन करून बोलावले जाते, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. प्रवाशाची हकीकत – चालक रील बनवत होता बंजारा ट्रॅव्हल्समधील प्रवासी रतन नेमाडे यांनी संपूर्ण घटना सांगितली. ते पनवेलहून प्रवास करत होते व केबिनमध्ये बसले होते. रात्री तीनच्या सुमारास दुसऱ्या चालकाने वाहन हातात घेतले. काही मिनिटांतच त्याने मोबाईलवर रील बनवण्यास सुरुवात केली. नेमाडे यांनी चालकाला वारंवार विनंती करूनही तो ऐकला नाही. गाणे लावून रील बनवणे सुरूच होते. मेहकर समृद्धी टोल नाका जवळ उतारावर बस वेगात असतानाही चालकाने वेग कमी केला नाही. अचानक ब्रेक मारल्याने बस पलटी झाली. “या अपघाताला पूर्णपणे चालक जबाबदार आहे,” असा आरोप नेमाडे यांनी केला. माजी आमदार पुत्र निरज रायमुलकर यांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटांमध्ये घटनास्थळावर पोहोचले व मदत कार्य सुरू केले ॲम्बुलन्स मध्ये रुग्ण पाठवून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. परंतु एक तास पोलीस घटनास्थळावर आले नसल्यामुळे निरज रायमुलकर यांनी संताप व्यक्त केला. जखमींची नावे वैभव धुळे शांती जाधव विजय राठोड किरण यशपाल राठोड आशा देवकर किशन चव्हाण मैफूज अहमद अस्वद अहमद (हात मोडलेला) उमीहाणी अहमद (लहान मुलगी) सुशील खडसे (पाय मोडलेला) रूपचंद गजानन बावनकुळे (मुका मार) योगिता रूपचंद बावनकुळे अविनाश राठोड राजेश चव्हाण लवकित चव्हाण पूजा राठोड ध्रुवी राठोड (लहान मुलगी) कारवाईची मागणी
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *