Headlines

स्कूल ठीक करो अभियान टीमला पोलिसांकडून अडवणूक:काटोल तालुक्यातील लाडगाव शाळेच्या पाहणीवेळी घटना




नागपूर जिल्ह्यात ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला पोलिसांच्या अडवणुकीचा सामना करावा लागला आहे. ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी काटोल तालुक्यातील लाडगाव येथील शासकीय शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियानाच्या टीमला स्थानिक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची टीम ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक आणि मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी लाडगाव येथील शाळेत पोहोचली होती. टीम शाळेची पाहणी करत असतानाच अचानक पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी टीमला शाळेची पाहणी करण्यापासून मज्जाव केला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अभियानाच्या टीमने शांतता व संयम राखत आपला उद्देश प्रशासनासमोर स्पष्ट केला. अभियानाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “आमचा हा उपक्रम कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्रशासनाच्या विरोधात नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक व मूलभूत सुविधांची खरी परिस्थिती समोर आणणे हाच आमचा उद्देश आहे. शाळेतील सुविधा, मुलांची सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांबाबत प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक जबाबदारीचा भाग आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आम्ही प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक यंत्रणांचा पूर्ण सन्मान राखूनच प्रत्येक शाळेची पाहणी करत आहोत. शाळा ही आपल्या मुलांच्या भविष्याची जडणघडण करणारी जागा आहे, त्यामुळे अशा नागरिक-केंद्रित उपक्रमांना अडवण्याऐवजी प्रशासनाने सहकार्य करायला हवे.” या घटनेच्या पार्श्वभूमीवर, अभियानाच्या टीमने संबंधित प्रशासनाला विनंती केली आहे की, नागरिकांच्या सहभागातून चालणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये अडथळे आणू नयेत. उलटपक्षी, ग्रामीण शाळांच्या वास्तविक परिस्थितीमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन सहकार्य करावे, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *