![]()
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आक्रमक मोहीम उघडली आहे. “हॉटेल पंचतारांकित असो किंवा रस्त्यावरील स्ट्रीट फूड सेंटर, नियम मोडणाऱ्यांवर थेट आणि कठोर कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षेच्या बाबतीत कोणालाही सवलत मिळणार नाही,” असा स्पष्ट इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७०० हून अधिक आस्थापनांना आतापर्यंत नोटिसा बजावण्यात आल्या असून, सुमारे १०० आस्थापनांनी याविरोधात अपिले दाखल केली आहेत. कारवाई करताना आस्थापनेचे स्थान किंवा मालकाचा प्रभाव विचारात न घेता कायद्यानुसार निष्पक्ष पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच खाद्यपदार्थांच्या विक्रीवर एफडीएची विशेष नजर असणार आहे. यासाठी वर्षभराचे विशेष कॅलेंडर तयार करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत तपासणीचे आदेश जारी केले जातील, असेही मुंडे यांनी या वेळी बोलताना सांगितले. रक्तपेढ्या आणि औषधांचे कडक नियमन होणार राज्यामध्ये औषधांचा दर्जा आणि रक्तपेढ्यांच्या मानकांवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. केवळ परवानाधारक संस्थांनाच रक्तदान शिबिरे आयोजित करता येतील, असे सांगताना जेनेरिक औषधांच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यास कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही या वेळी मुंढे यांनी बोलताना दिला. प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरने लायसन्स घेतले पाहिजे जिथे जिथे विनापरवाना, विना स्टँडर्ड, विदाऊट प्रोटोकॉल असेल, तर ते नियमभंग करत आहेत. मग ते फेस्टिव्ह सीजन असो वा नसो, ते महत्त्वाचे नाही. प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरने लायसन्स घेतले पाहिजे, रजिस्टर्ड पाहिजे, स्टँडर्ड रेग्युलेशनने ते पुरवले पाहिजे. ही रुटीन प्रोसेस आहे, फेस्टिव्ह सीजन म्हणून नाही, असेही मुंढे यांनी या वेळी सांगितले. या वेळी विविध प्रश्नांचीही उत्तरे दिली. शाळा, अंगणवाड्या व ‘डार्क किचन’वर नजर केवळ ३ महिन्यांत ६० हजारांहून अधिक तक्रारी आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना मुंढे म्हणाले, “मी सेलिब्रिटी नाही, फक्त एफडीए आयुक्त म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे ही माझी बांधिलकी आहे.” गेल्या तीन महिन्यांत प्रशासनाकडे ६० हजारांहून अधिक तक्रारी आल्या असून त्याआधारे कारवाईची व्याप्ती वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कारवाईनंतर अनेक रेस्टॉरंट्सकडून स्वतःहून सुधारणा आणि किचनचे नूतनीकरण कारवाईनंतर अनेक रेस्टॉरंट्सकडून स्वतःहून सुधारणा आणि किचनचे नूतनीकरण केले जात आहे. काही रेस्टॉरंट्सनी ठराविक कालावधीनंतर स्वतःहून किचन बंद ठेवून स्वच्छता आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शहर आणि ग्रामीण भागातून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेत बदल झाला आहे. तेल, खाद्यपदार्थांचे रंग आणि दुधाच्या चवीत बदल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Source link
पुन्हा एकदा तंबी:फाइव्ह स्टार असो वा स्ट्रीट फूड, नियम मोडल्यास कारवाई होणार- तुकाराम मुंढे