Headlines

आरक्षण संपवणाऱ्यांविरुद्ध ‎मुंबईत आंदोलन- प्रा. हाके‎:1 सप्टेंबरला राज्यातील ओबीसी समाजबांधव मुंबईत धडकणार‎




राज्यात ओबीसी आरक्षण संपविण्याचे काम ‎‎‎सध्याच्या राज्यकर्त्यांनी केले ‎‎‎असून या विरोधात १‎‎ सप्टेंबरला मुंबईत आंदोलन‎‎ केले जाणार आहे. यामध्ये ‎‎‎हजारो ओबीसी बांधव‎‎सहभागी होणार असल्याचा ‎‎‎दावा प्रा.‎‎लक्ष्मण हाके यांनी बुधवारी ‎केला.‎ हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात ‎ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते‎ माध्यमांशी बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान ‎व्ही. पी. सिंग यांनी लागू केलेल्या मंडल ‎आयोगामुळे ओबीसींच्या आयुष्यात नवीन ‎पर्व आले होते. मात्र मागील तीन ते चार‎ वर्षात राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ओबीसींचे आरक्षण संपविले आहे. त्यामुळे‎ ओबीसींवर अन्याय होत असून स्वातंत्र्यांच्या‎ लढ्याप्रमाणे पुन्हा एकदा ओबीसींच्या ‎हक्काचा लढा उभा केला जाणार असल्याचे‎ त्यांनी सांगितले. राज्यात ओबीसींचे आरक्षण‎ संपले असूनही सत्ताधारी तसेच विरोधक ‎बोलण्यास तयार नाहीत. ओबीसी आरक्षण‎ कसे संपले नाही हे दाखवून द्यावे असे‎ आव्हान त्यांनी यावेळी दिले.‎ पुणे जिल्ह्यातील दौंड येथून‎ मुंबईच्या दिशेने कूच करणार‎ मुंबईतील आंदोलनासाठी आवश्‍यक‎ परवानगीचे अर्ज पोलिस प्रशासनाकडे दिले‎ आहेत. १ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील दौंड‎ तालुक्यातील पारस टोलनाका येथून हजारो‎ ओबीसी बांधव मुंबईच्या दिशेने कुच करणार‎ असल्याचे प्रा. हाके यांनी सांगितले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *