![]()
धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोबरगहू येथील ५८ वर्षीय महिलेचा शेतातून घरी परतत असताना गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २७) रात्री घडली. या प्रकरणी एलसीबी व धारणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी मृतक महिलेच्या दिराला अटक केली. मृतक महिला जादूटोणा करते, या संशयातून तीचा खुन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. समोती रामभाऊ कासदेकर (५८, रा. गोबरगहू, ता. धारणी) असे मृत महिलेचे तर रामलाल लक्ष्मण कास्देकर (५५, रा. गोबरगहू) असे मारेकऱ्याचे नाव असून त्याला अटक केली आहे. २७ ऑगस्टला सकाळी समोती कासदेकर या कारदा शिवारातील त्यांची मोठी मुलगी सविता सावलकर यांच्या शेतात निंदणाच्या कामासाठी गेल्या होत्या. शेताकडे जाणाऱ्या मार्गातील एका मक्याच्या शेतात समोती कासदेकर या निपचित अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या गळ्यातील चांदीच्या कड्यानेच गळा आवळल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. दरम्यान रामलाल कास्देकरवर संशय असल्यामुळे एलसीबीचे पीआय अशोक लांडे, धारणीचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, पीएसआय सागर सरदार व त्यांच्या पथकाने रामलालचा शोध घेवून त्याला अटक केली.
Source link
अमरावती:जादूटोण्याच्या संशयातून दिराकडून वहिनीचा खून