Headlines

कन्नड येथील रस्त्यांना अडथळा ‎ठरणारे खांब हटवण्याची मागणी‎:शिवसेना गटनेते व नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांची महावितरणकडे मागणी




कन्नड शहरातील विविध वसाहतींमध्ये अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले असले तरी, अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागीच ठेवण्यात आले आहेत. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून रस्ते असूनही नागरिकांना त्यांचा वापर करता येत नाही. हे अडथळा ठरणारे विद्युत खांब तातडीने हटवावेत, अशी मागणी शिवसेना गटनेते व नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांनी महावितरणकडे केली आहे. शहरातील विकासकामांचा आढावा घेताना अग्रवाल म्हणाले की, गेल्या १० ते १५ वर्षांत अंतर्गत सिमेंट रस्ते झाले, परंतु तत्कालीन नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनाअभावी विजेचे खांब तसेच राहिले. याप्रकरणी नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद, नगरसेवक अब्दुल जावेद आणि मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी महावितरणला शहरातील सर्व अडथळा ठरणारे खांब सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रसंगी माजी नगरसेवक रत्नाकर पंडित, गोकुळ राठोड, आकाश बोलधने, डॉ. आनंद मोतिंगे, मधुकर बाविस्कर, अरुण चौथे, आनंद गोयंका, आकाश भारुका, तेजपाल जैन, ॲड. कृष्णा जाधव आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पथदिवे हटवण्याची मोहीम सुरू Ãकन्नड शहरात ३,५६५ पथदिवे असून रस्त्यात अडथळा ठरणारे पोल हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे. नगरपालिकेत सध्या कायमस्वरूपी एकही वायरमन नसून केवळ ६ कंत्राटी कामगारांवर काम सुरू आहे. -राहुल करडे, विद्युत अभियंता, नगरपरिषद कन्नड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *