Headlines

चांदवडकरांना टोलमुक्ती देण्यासाठी घेराव‎:मंगरूळ टोल नाक्यावर वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाची आक्रमक भूमिका




मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ येथील टोल प्लाझावर चांदवड तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांकडून करण्यात येत असलेल्या टोल वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी मंगरूळ टोल प्लाझाच्या व्यवस्थापकाची भेट घेत चर्चा केली. तालुक्यातील वाहनधारक, शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांना विविध कामानिमित्त महामार्गावरून वारंवार प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून टोल वसुली करणे अन्यायकारक असल्याचे सांगत शिवसैनिकांनी स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्ती देण्याची मागणी केली. तालुकाप्रमुख विलास भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी टोल व्यवस्थापकाशी चर्चा केली. त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दि. १ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊन कळविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सोमनाथ पगार, अशोक शिंदे, धर्माजी सोनवणे, भाऊसाहेब ठाकरे, भारती जाधव आदी उपस्थित होते. ..अन्यथा तीव्र आंदोलन सोमवारनंतरही चांदवड तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती देण्यात आली नव्हती, यामुळे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *