Headlines

निलजगाव पीएचसीतर्फे हनुमंतगावात टीबीमुक्त मोफत तपासणी अभियान:राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग




ढोरकीन | पैठण तालुक्यातील हनुमंतगाव येथे निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत टीबीमुक्त अभियान नुकतेच राबविण्यात आले. राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत निदान व उपचार अभियान घेण्यात आले. ग्रामस्थांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोगाचे निदान, उपचार याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक महेश कोरडे, टीबी हेल्थ व्हिजिटर इर्शाद सय्यद, रेडिओलॉजिस्ट रमेश तांबारे, वरिष्ठ पर्यवेक्षक आरिफ सय्यद, आरोग्य कर्मचारी वैभव कांबळे, चंद्रकांत व्ही. मगरे, अंगणवाडी कार्यकर्ते के. एम. लोमटे, एन. एम. गवांदे, आशा कार्यकर्ती पुजा भादे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *