![]()
मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील एकजूट, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. या निवडणुकीत प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ टी. कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या उमेदवारांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित संचालकांमध्ये प्रवीण यशवंत दरेकर, मिलिंद तातू कांबळे, अंकुश रामचंद्र जाधव, अमोल श्रीपती खरात, वर्षा अजित माळी, शिवाजीराव विष्णू नलावडे, नितीन धोंडीराम बनकर, सतीश दत्ताराम सावर्डेकर, विजय गोविंद जाधव, अनिल दत्तात्रय गजरे, शंकर काशिनाथ अय्यप्पा, बाळासाहेब दिनकर घाडगे, मिलिंद गोविंद राऊत, श्रीधर विश्वनाथ जगताप, किशोर दत्तात्रय पाटणकर, प्रवीण दयारू डिकले, सुरेश विठ्ठल भोळेराव, विठ्ठल ज्ञानेश्वर वाळुंज, जयंत लक्ष्मण शिरसिकर, मदन दादासाहेब यादव आणि अनिषा अ. माजगावकर यांचा समावेश आहे. मुंबईतील सहकार चळवळ अधिक सक्षम करणे, सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासदांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणे तसेच बदलत्या काळानुसार सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ प्रयत्नशील राहील. बिनविरोध निवडीमुळे सहकार क्षेत्राने संघर्षाऐवजी समन्वय, स्पर्धेऐवजी सहकार्य आणि संस्थेच्या व्यापक हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचा सकारात्मक संदेश गेला आहे. सर्व घटकांना विश्वासात घेऊन मुंबई सहकारी बोर्डाच्या माध्यमातून सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देऊ, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सहकार क्षेत्रातील विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांकडून नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे. या बिनविरोध निवडीबद्दल प्रभाग समिती अध्यक्ष व मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि.चे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, मुंबई-कोकण विभागीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष सुनील बांबुळकर यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Source link
मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध:संस्थेच्या व्यापक हिताला प्राधान्य दिल्याचा सकारात्मक संदेश गेला- प्रवीण दरेकर