![]()
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पैठण ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे यंदा १८ वे वर्ष आहे. मंगळवारी (दि. १) सकाळी ८ वाजता साईनामाच्या जयघोषात शेकडो साई भक्तांच्या उपस्थितीत दिंडीचे पैठण येथून उत्साहात प्रस्थान झाले. ओम साईराम’, ‘साईनाथ महाराज की जय’च्या ज
.
साईनाथ भक्त परिवार पैठणकर यांच्या वतीने दरवर्षी या पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. चार दिवसांच्या या पायी प्रवासात भजन, साई नामाचा जप तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, सबुरी, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी ही दिंडी गेल्या १८ वर्षांपासून अखंड सुरू आहे. पैठणहून प्रस्थान केल्यानंतर दिंडीचा पहिला मुक्काम गुंफा (ता. शेवगाव) येथे होणार आहे. दुसरा मुक्काम शनी शिंगणापूर (ता. नेवासा), तर तिसरा मुक्काम बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे होणार आहे. गुरुवारी (दि. ४) गोकुळाष्टमीच्या पावन दिवशी दिंडी शिर्डी येथे पोहोचणार असून, साईबाबांच्या समाधी मंदिरात दर्शन घेऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.
दिंडीच्या मार्गावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिस्त, सुरक्षितता आणि स्वच्छतेचे पालन करून भक्तांनी दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या दिंडीत प्रा. संतोष गव्हाणे, दत्ता घोडके, संदीप आहेर, बजरंग काळे, राजू गायकवाड, बाळू आहेर, रमेश नवगिरे, आकाश रावस, संजीव कोरडे, अविनाश बडसल, संदीप धोकटे, संतोष म्हस्के, गजानन खराद, लक्ष्मण येडे, निलेश जाधव, कृष्णा शिंदे, दीपक गवळी, सचिन कानेटकर, राजेंद्र भालेकर, विठ्ठल रोकडे, निलेश आडसुळ, आदर्श परदेशी, ओमकार हजारे, आकाश आडसुळ, शाहू जाधव, रितेश बल्लैया, बंटी लोहारे, माऊली नवगिरे, विनोद चव्हाण, शंकर रेंगे यांच्यासह शेकडो साई भक्त सहभागी झाले.