![]()
युवा पिढीमध्ये देशभक्ती, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीचा संदेश रुजविण्याच्या उद्देशाने युवान आणि प्रवाह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लासलगाव येथे ‘रन फॉर नेशन’ रॅलीचे आयोजन मंगळवारी (दि. १) करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयातील युवक
.
रॅलीच्या माध्यमातून युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरातून हातामध्ये राष्ट्रध्वज घेत रॅलीला सुरुवात करण्यात आली. स्टेशनरोड, बसस्टॅण्ड या प्रमुख मार्गावरून झेंडा चौकात समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. झेंडा चौकामध्ये रॅलीचे आगमन झाल्यानंतर युवकांना नशामुक्तीसाठीची शपथ देण्यात आली. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या रॅलीत लासलगाव महाविद्यालय तसेच श्री महावीर महाविद्यालयाच्या युवक-युवतींनी तसेच शहरातील युवा कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.