Headlines

खरीप पिके वाया गेली, मंगळवेढा तालुक्यास म्हैसाळचे पाणी सोडा:काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्यातर्फे तहसीलदार यांना निवेदन‎




यावर्षी मंगळवेढा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, यावर्षी पावसाळा सुरू झाल्या नंतर अपेक्षित पाऊस मंगळवेढा तालुक्यात पडला नाही, पावसाने पूर्णपणे तालुक्याकडे पाठ फिरवली सर्व नक्षत्र कोरडी केली, त्यामुळे तालुक्यात गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली ,मंगळवेढा तालुक्यातील पावसाची सद्यस्थिती पिकांच्या अवस्था पाण्याची उपलब्धता याचा तातडीने पंचनामा करून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून मंगळवेढा तालुका जाहीर करावा, पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या वतीने तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे सोमवारी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. रविकिरण कोळेकर, मंगळवेढा शहराध्यक्ष ॲड राहुल घुले ,शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले ,सचिन पाटील,श्रीमंत केदार ,काँग्रेसचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संदीप पवार,भटक्या विमुक्त जाती कमिटीचे तालुकाध्यक्ष राजन ठेंगील ॲड महेश जानकर ॲड विजय पुजारी आदिजण उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले की,तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर खरीप पिकाची पेरणी केली त्यांची पिके पावसाअभावी अक्षरशा जळून गेली आहेत शेतकऱ्यांनी कष्टाने बी, बियाणे ,खते मशागत व पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला पैसे नसतानाही उसनवारी केली, परंतु आता पिकेच वाचत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत आहे पाऊस न पडल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन संबंधित जलसंपदा, महसूल ,कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे बैठक घेण्याची मागणी या निवेदनातील मागण्यावर पुढील पाच दिवसात रोज कारवाई न झाल्यास मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी व शेतकरी संघटना तसेच नागरिकांच्या वतीने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सिद्धाराम काकणगी तसेच तालुका काँग्रेसचे पदाधिकारी सुनीता अवघडे, बापू अवघडे ,तुळशीदास मुटेकर उपस्थित होते. या केल्या प्रमुख मागण्या मंगळवेढा तालुक्यातील पावसाची सद्यस्थिती पिकांच्या अवस्था पाण्याची उपलब्धता याचा तातडीने पंचनामा करून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून मंगळवेढा तालुका जाहीर करावा, पावसा अभावी नुकसान झालेल्या खरीप पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच इतर शासकीय मदत मिळवून द्यावी तसेच गेल्या वर्षी अति पावसामुळे ज्या लोकांना अजून मदत मिळाले नाही त्यांनाही मदत मिळावी कृष्णा नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले वाहून जाणारे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे मंगळवेढा तालुक्यात सोडण्यात यावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *