![]()
यंदा पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर अचानक मोठा खंड दिला आहे. परिणामी, पैठण तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. तालुक्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ३० टक्क्यांच्या आसपासच पाणी उपलब्ध अस
.
पाऊस झाल्यास तलाव भरणार पाझर आणि सिंचन तलाव मिळून तालुक्यातील या सर्व लहान प्रकल्पांची एकूण जिवंत साठवण क्षमता १.८६९ दलघमी इतकी आहे. या साठ्यातून तालुक्यातील १,०४६ हेक्टर प्रकल्पीय सिंचन क्षेत्राला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आधार मिळतो. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यास हे तलाव पूर्ण क्षमतेने भरतात. त्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांची भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होते.