![]()
प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने द ग्रॅज्युएट फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात २७१ जणांना नोकरी मिळाली. यापैकी १२२ उमेदवारांना लगेच नियुक्तीपत्रे देण्यात आली असून इतरांना यथावकाश नियुक्तीपत्र पाठवले जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा स्वरूपाचा रोजगार मेळावा पार पडल्याने परिसरातील युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला संचारला आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. निकु खालसा होते. उद्घाटन नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मोहम्मद जमीर, नगरसेवक अक्षय पारस्कर, योगेश चव्हाळे, वासुदेव लोखंडे, मोहम्मद साजिद, अविनाश ब्राम्हणवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. “कंपन्या आपल्या दारी” या संकल्पनेतून विविध नामांकित कंपन्यांना थेट नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या शहरात न जाता आपल्या परिसरातच मुलाखती देण्याची व रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. अनेक मान्यवरांच्या भेटी, कौतुकाचा वर्षाव या उपक्रमाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजप्रेमी व्यक्ती व मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावनादेखील अनेकांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर असे उपक्रम वरचेवर आयोजित केले जावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
Source link
७३५ जणांच्या मुलाखतीअंती २७१ युवकांना नोकरी:द ग्रॅज्युएट फाउंडेशनचा पुढाकार; नियुक्तीपत्रकांचेही केले वितरण