![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा करमाडच्या कार्यक्षेत्रातील भांबर्डा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र तसेच नवीन पीक कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
.
या कार्यक्रमास फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर श्रीराम भोर आणि छत्रपती संभाजीनगर क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोहर वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तसेच पुढील हंगामाच्या शेतीकामासाठी आर्थिक पाठबळ म्हणून नवीन पीक कर्ज मंजुरी पत्रे सुपूर्द करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या कर्जमुक्ती योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांना पुन्हा नव्याने कर्ज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रामराव शेळके, देवगिरी बँकेचे संचालक सजनराव मते, बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ उकर्डे, सुदाम ठोंबरे, डॉ. जिजा कोरडे यांच्यासह बँकेचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल कर्जमुक्तीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. सूत्रसंचालन शाखा व्यवस्थापक निलिमा बोटूवार यांनी केले, तर आभार अधिकारी रविता पाटील यांनी मानले.