Headlines

पीककर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ची अट रद्द करा:गुणवंत होळकर यांची राहुल गांधींकडे मागणी‎




शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळताना सिबिल स्कोअरची अट लावली जात असल्याने अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या केंद्र/राज्य योजना सनियंत्रण समितीचे जिल्हाध्यक्ष गुणवंत अशोक होळकर यांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून असून, सध्या शेतकरी नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटांचा सामना करीत आहेत. बियाणे, मजुरी, औषधे व रासायनिक खतांच्या वाढत्या खर्चामुळे शेतीची लागत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत, असे होळकर यांनी पत्रात नमूद केले आहे. शेतकऱ्यांकडून बँकेचे कर्ज घेतल्यानंतर हप्ते वेळेत न भरल्यास ते थकीत होऊन सिबिल स्कोअर कमी होतो. परिणामी पुढील हंगामासाठी पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतात. राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही सिबिल स्कोअरच्या आधारे कर्ज देण्याची प्रक्रिया होत असल्याने अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहत असल्याचे पत्रात म्हटले आहे.“शेतकऱ्यांना पीककर्ज देताना सिबिल स्कोअरची अट काढून टाकावी आणि बँकांकडून त्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी होळकर यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *