Headlines

महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत:सतेज पाटलांचा हल्लाबोल; धनंजय महाडिकांच्या 25-0 विजयाच्या दाव्याची उडवली खिल्ली




महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत आल आहे, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे, असा हल्लाबोल सत्ताधारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला. महायुतीमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे. एकमुखी दूध उत्पादक आमच्या बाजूने राहतील अशी मला खात्री आहे. दरम्यान, गोकुळवरून खासदार धनंजय महाडिक यांनी 25-0 अशा विजयाचा दावा केला होता, ज्यावर सतेज पाटील यांनी खोचक टीका करत पलटवार केला. महाडिकांच्या या दाव्याचा समाचार घेताना पाटील म्हणाले की, महापालिकेचा निकाल सुद्धा त्यांनी सांगितला होता, चार-पाच नगरसेवक आमचे येतील असेही ते म्हणाले होते. अशा शब्दांत सतेज पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली. शक्तीपीठ आंदोलनावरून राजेश क्षीरसागरांवर निशाणा आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ आंदोलनावरून राजेश क्षीरसागर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री व्हायची घाई लागली आहे, कधी एकदा आबिटकर यांना बाजूला करून मी मंत्री होतोय म्हणून शासनाची बाजू परखडपणे मांडत आहेत. यासंदर्भात क्षीरसागर यांना विनंती करत ते पुढे म्हणाले, क्षीरसागर यांना शक्तिपीठमध्ये पडायची गरज नव्हती, हा ग्रामीण भागाचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या आमदारांना म्हणजे आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि कोरे यांना तुमच्या बाजूने बोलायला लावा आणि मग तुम्ही शक्तिपीठची बाजू घ्या. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर सवाल तसेच राजू शेट्टी यांच्याबाबत बोलताना सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की, राजू शेट्टी हे राज्याचे नेते आहेत, राज्याच्या नेतृत्वावर बोलताना त्याची रिएक्शन येणारच. या प्रकल्पाबाबत नेत्यांना थेट आव्हान देत ते म्हणाले, शक्तिपीठ हिताचा कसा वाटतोय आणि राज्याची वाट कशी लागते हे तुम्ही लोकांना सांगा. या प्रकल्पातून काय नुकसान होणार आहे हे सांगा म्हणजे लोक निर्णय घेतील, कारण नसताना हा प्रकल्प राबवून शेतकऱ्यांच्या माथी हा मारला जात आहे. तसेच, एकनाथ शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्दची भूमिका घेतली ती खरी की खोटी? असा थेट सवालही सतेज पाटील यांनी केला. शक्तीपीठाविरोधात संघर्ष करणार निवडणुकीपूर्वी केवळ मते लाटण्याच्या उद्देशाने सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली आणि मते मिळाल्यानंतर मात्र या बहिणींना वाऱ्यावर सोडले. सध्या सरकारमधील प्रत्येकजण केवळ मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आणि त्यांना बरे वाटेल असेच बोलण्यात मग्न आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसोबत मिळून तीव्र संघर्ष करणार असल्याचा स्पष्ट इशाराही सतेज पाटील यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *