![]()
मुस्लीम आणि हिंदू बांधवांमध्ये समाजिक सलोखा राहिला पाहिजे अशी भाषा सरसंघचालक अमेरिकेत वापरतात आणि संघाचा भाग असलेली विश्व हिंदू परिषद टिळा लावल्याशिवाय दांडिया खेळायला येऊ देऊ नये असे सांगते ही त्यांची दुटप्पीभूमिका आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, गुलाबराव पाटील यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. सत्ताबदल झाला की पक्ष बदलणारे ते पहिले असतील. ज्या क्षणी सुप्रीम कोर्टचा निकाल लागेल त्या क्षणी काय होते हे पाहा. बापटांना मारणाऱ्यांचा सत्कार करत आहे यामध्ये काही नवे नाही. लोकांना वेड्यांत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. फडणवीसांच्या काळात हजारो विद्यार्थ्यांचा छळ संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी एमपीएससी आयोगाबद्दल जे मत व्यक्त केले आहे ते अगदी योग्य आहे. महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकारी पुरवण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा आयोग करत असते. यामार्फत जी भरती प्रक्रिया होते ती पारदर्शक व्हावी म्हणून या आयोगाची स्थापना यशवंतराव चव्हाण यांनी केली. या संस्थांचे पावित्र जपण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. पण फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थ्यांचा छळ झाला. कारण त्या आयोगावर आपला माणूस आणत आपल्या माणसांना मदत व्हावी ही भूमिका भाजपची सर्वत्र राहिली आहे. नीट ते युपीएसी प्रत्येक ठिकाणी केवळ आमचाच माणूस लावयचा हे त्यांचे धोरण आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आयोग बरखास्त करा संजय राऊत म्हणाले की, हजारो विद्यार्थी जे रस्त्यावर आहेत ते जर लोकसेवा आयोगाच्या दिशेने चालायला लागले तर लोकसेवा आयोगाला कुलूप लावण्याची वेळ येईल. देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांनी हा आयोग बरखास्त केला पाहिजे. भ्रष्ट लोकं या आयोगावर नेमण्यात आले आहेत ते सर्व भाजपच्या विचारसरणीचे लोकं आहेत. आता सनदी अधिकारी सुद्धा भाजपच्या गोटातील आहेत. ते केवळ सरकारच्या विचाराचे आहेत उद्या आमचे सरकार आले तर ते आमच्यासोबत येतील. फडणवीसांनी आत्मपरीक्षण करावे संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे गृहस्थ आहेत. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे जर सरकारला माहिती नसेल तर त्यांनी परदेश दौऱ्यावर गेले पाहिजे. जीडीपी वाढली असेल तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या का करत आहेत. फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करत स्वत:मधील खोटारडेपणा बाहेर काढला पाहिजे. हे ही वृत्त वाचा कृष्णराज महाडिक ‘युवक काँग्रेस’चे प्रदेशाध्यक्ष:मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला, धनंजय महाडिकांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासास्थानाबाहेर आंदोलन पुकारल्यामुळे चर्चेत आलेले भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आंदोलनादरम्यान मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे बॅकफूटवर जावे लागल्यानंतर, आता कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. वाचा सविस्तर
Source link
संघ अन् विश्व हिंदू परिषदेची दुटप्पी भूमिका:अमेरिकेत सलोख्याची भाषा अन् इथे टिळ्याची अट, लोकसेवा आयोग बरखास्त करा- संजय राऊत