Headlines

पुण्यात डिलिव्हरी बॉयच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार:पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न, एकावर गुन्हा दाखल




पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील संत गाडगे महाराज वसाहतीत पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात सौरभ किशोर गायकवाड (वय २३, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गौरव बबन राजगुरु (वय २७, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सौरभ गायकवाड हा ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करतो. आरोपी गौरव राजगुरुसोबत त्याचा पूर्वीपासून वाद होता. याच वादातून आरोपीने संत गाडगे महाराज वसाहत परिसरात गायकवाडला अडवून शिवीगाळ केली आणि त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. या घटनेनंतर आरोपी गौरव राजगुरु घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पिस्‍तुल बाळगणाऱ्याला बेड्या, गुन्‍हे शाखेच्‍या युनिट 2 ची कारवाई बेकायदेशिररित्‍या लोखंडी पिस्‍तुलासह दोन पिस्‍तुल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे बाळणाऱ्या एकाला गुन्‍हे शाखेच्‍या युनिट 2 ने बेड्या ठोकल्‍या त्‍याकडून पिस्‍तुल आणि काडतुसे जप्‍त करण्यात आली. ओकांर महेश थोरात (25, रा. साई माऊली हाईट्स, पिणी वस्‍ती, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार उज्‍ज्‍वल शांताराम मोकाशी यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आंबेगाव येथील दरी पुलाखाली जांभुळवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *