![]()
त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा, समाजकल्याण वसतिगृहे तसेच अनिवासी शाळांमधील दुरावस्था आणि विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्नांकडे शासन व संस्थाचालकांचे लक्ष वेधण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी हरसूल येथे उपोषण सुरू केले आहे. शासनाचे लक्ष
.
पेठ व त्र्यंबकेश्वरमधील सर्व अनुदानित शाळा व आश्रमशाळांच्या परिसराला पक्की संरक्षक भिंत, रात्रीच्या सुरक्षेसाठी एलईडी पथदिवे, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बेड व गाद्या, पुरेशी व स्वच्छ स्वच्छतागृहे आणि आरओ प्लांटद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी, सोलर वॉटर हीटर, कपडे धुण्याची स्वतंत्र व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित सुविधा व तक्रार पेटी, सफाई कर्मचारी व निवासी नर्सची नियुक्ती आदी मागण्या केल्या आहेत.