Headlines

शेतकऱ्यांसह युवकांना शेतीपूरक व्यवसायातून स्वावलंबनाची वाट:जेऊर, शेलगाव येथे उद्योग विकास कार्यशाळा; शेतकरी उद्योजकांचा प्रतिसाद‎



पांडे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन व उद्योगांकडे वळावे, यासाठी ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कामगिरी उंचावणे व गतिमान करणे’ या उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील जेऊर व शेलगाव येथ

.

या वेळी मार्गदर्शन करताना सुयश कर्चे म्हणाले, करमाळा तालुक्यात प्रथमच अशा वेगळ्या दृष्टिकोनातून शेतकरी व ग्रामीण नागरिकांसाठी उद्योग विकासाचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अतिवृष्टी, पूर व दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पारंपरिक शेतीसोबत पशुपालन व इतर शेतीपूरक व्यवसाय उभारून शेतकऱ्यांना अतिरिक्त व शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांनी उद्योग व स्वयंरोजगाराकडे वळावे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. करमाळा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांमध्ये शासनाच्या विविध योजना, अनुदान व उद्योगाच्या संधींची माहिती तळागाळातील शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास माजी युवासेना तालुका उपाध्यक्ष शहाजी बोराडे, ओबीसी तालुका उपाध्यक्ष प्रदीप मेटे, युवासेना तालुका उपाध्यक्ष ज्योतीराम काळे, रामकृष्ण टेलर, एसबीआय लाइफचे माधव सूर्यवंशी, सरपंच अण्णासाहेब पाटील, उद्योजक संतोष बदे, बापू मोरे, राहुल कर्चे, नितीन निमगिरे, संकेत मटेकर आदींसह शेतकरी, युवक, उद्योजक, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीतील जोखमी कमी करून उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.

पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग तसेच लघुउद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकते. शासनाच्या विविध योजना, कर्ज सुविधा, अनुदान आणि उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या संधींची योग्य माहिती मिळाल्यास ग्रामीण युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करता येईल. त्यामुळे शेतकरी व युवकांनी या संधींचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

स्वयंरोजगार उभारणीबाबत दिले मार्गदर्शन कार्यशाळेत पशुपालन, शेतीपूरक उद्योग, स्वयंरोजगार, उद्योग उभारणी तसेच शासनाच्या विविध योजना व अनुदानाचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी व युवकांनी शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता त्यासोबत विविध व्यवसाय उभारून उत्पन्नाचे साधन वाढवावे, असे आवाहन मार्गदर्शकाकडून करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *