![]()
शहरातील वाढती गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, महिलांची सुरक्षा आणि पोलिसिंग अधिक प्रभावी व्हावी, या उद्देशाने रविवारी (दि. ६) शासकीय विश्रामगृह येथे विविध सामाजिक, राजकीय व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. अमरावती शहराला गुन्हेगार
.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रतिनिधींनी तीव्र चिंता व्यक्त केली. ‘हत्यारमुक्त अमरावती’ अभियानासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची गस्त वाढविणे, स्वसंरक्षण प्रशिक्षण व कायदेशीर मार्गदर्शन, पेपर स्प्रेच्या वापराबाबत जनजागृती, तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचे उपक्रम राबवण्याचे सुचवण्यात आले. शाळा-महाविद्यालयांत दरमहा सुरक्षा बैठका घेण्याची मागणीही करण्यात आली. रात्री ११ नंतर विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोर व संशयितांवर कारवाई, पोलिस पेट्रोलिंग वाढवणे, उड्डाणपुलाखालील व संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष, प्रलंबित सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे आणि नवीन कॅमेरे बसवण्यावर भर देण्यात आला. पोलिस ठाण्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, ‘पोलिस मित्र’ योजनेत सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवावा, अशी मागणी करण्यात आली.
ऑनलाइन चाकू व घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या व विक्रेत्यांवर कारवाई, कोचिंग क्लासेसच्या संचालकांसोबत नियमित बैठक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स, महाविद्यालय परिसरातील अवैध विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई आणि कायद्याच्या धाकासोबत व्यापक जनजागृती करण्याचेही ठरले. ही चळवळ एका बैठकीपुरती मर्यादित न ठेवता प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत यांची होती उपस्थिती
संजय ठाकरे (मराठा सेवा संघ), वसु महाराज (प्रहार संघटना), समीर जवंजाळ (काँग्रेस), राजेश वानखडे (भीम ब्रिगेड), बंटी रामटेके (प्रहार), वैभव बगणे (भाजपा), संजय गव्हाळे (शिवसेना उबाठा), रितेश तेलमोरे (क्रांती सेना), अनुप भजे, सत्यजित राठोड (भाजपा), डॉ. कवलजीत पांडे (श्रीराम सेना), किरण गुळदे (युनायटेड रिपब्लिकन फोरम), रोशन कडू (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रीजीत पाटील (योटो फाउंडेशन), ॲड. कार्तिक देशमुख, मनोज थोरात (रिपाई), कैलास चव्हाण (सिनेट सदस्य), शुभम जवंजाळ (शिवसेना), अतिश डोंगरे (रिपाई), प्रमोद राऊत (वंचित बहुजन आघाडी), नितीन देशमुख, जितेश भुजबळ (छावा संघटना), प्रशांत गजभिये, शैलेश बागडे, बाबाराव मेश्राम, निखिल देशमुख, पंकज सुरडकर (युवा स्वाभिमान), सुनील खत्री, प्रशांत गजभिये, विलास भालधरे, मनीष कविट, अनुप बच्चे, ऋषिकेश खेळकर, बाबाराव मेश्राम, तसेच महिला संघटनांच्या प्रतिनिधी कोमल बद्रे (शिवसेना), प्रतीक्षा वैद्य, संगीता मडावी आदी उपस्थित होते.
बालगुन्हेगारीसाठी स्वतंत्र प्रतिबंधात्मक यंत्रणा ‘हत्यारमुक्त अमरावती’साठी विशेष समिती. दामिनी पथकाची गस्त व पोलीस पेट्रोलिंग वाढविणे. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे. पोलीस ठाणे व मनुष्यबळ वाढविणे, शाळा-महाविद्यालयांत नियमित सुरक्षा बैठका. ऑनलाइन घातक शस्त्रविक्रीवर कठोर कारवाई., महिलांसाठी स्वसंरक्षण व कायदेशीर मार्गदर्शन. कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना. पोलिसांना राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करून निष्पक्ष कारवाईची हमी.