![]()
घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका साकारत विविध विषयांचे अध्यापन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक भरत सुपेकर आणि विद्यार्थिनींमधुन मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापिकेची भूमिका साकारणाऱ्या कार्तिकी पाटील व पुनम मोरे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक बनलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांमध्ये आत्मविश्वासाने अध्यायनाचे कार्य पार पाडले. शिक्षकाची भूमिका बजावताना विद्यार्थ्यांनी वर्गातील शिस्त, संयम आणि शिक्षकांच्या जबाबदारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच शिपाई म्हणून सागर आहिरे यांने चोखपणे आपली भूमिका बजावली. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांच्या कार्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणारा हा अभिनव उपक्रम अविस्मरणीय ठरला. दिवसभर शिक्षक बनलेल्याविद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत होता. घाटनांद्र्यातील इंद्रगढी प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
Source link
घाटनांद्रा:इंद्रगढी शाळेत विद्यार्थिनींना अध्यापनाचा अनुभव