Headlines

केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा मार्ग 2 दिवस रात्रीच्या वेळी बंद:राष्ट्रमाता जिजाऊ कमानीच्या कामामुळे निर्णय




शहरातील केम्ब्रिज चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब कमानीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ८ ते ९ सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. सिडको वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली असून सलग दोन दिवस मध्यरात्री १२ ते सकाळी ०६.०० वाजेदरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या वाहतूक बंददरम्यान वाहतूक पोलिसांची विशेष गस्त या मार्गावर राहणार असून, वाहनधारकांना त्रास होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. अशी असेल व्यवस्था केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा बाजारतळ मार्ग बंद : पर्यायी मार्ग (जालन्याकडून शहरात येण्यासाठी): जालन्याकडून येणारी वाहने केम्ब्रिज चौकातून डावीकडे वळून झाल्टा फाटा – जुना बीड नाका – शनी आश्रम रोडवरून पुन्हा जालना रोड, देवळाई किंवा शहानूरमियाँ दर्गा रोडचा वापर करू शकतील. पर्यायी मार्ग : (शहराबाहेर जाण्यासाठी): झाल्टा फाटा येथून उजवीकडे वळून सरळ महानुभाव आश्रम चौक ते संग्रामनगर उड्डाणपुलाचा वापर वाहनधारकांना करता येईल.
चिकलठाणा बाजारतळ (शनी आश्रम कट) ते जालन्याकडे जाणारा मार्ग बंद : पर्यायी मार्ग (शहरातून जालन्याकडे जाण्यासाठी): शहराकडून जालन्याकडे जाणारी वाहने चिकलठाणा बाजारतळ येथून पुढे जुना बीड नाका, तेथून उजवीकडे वळून बीड बायपास रोडने डावीकडे वळून पुढे जालना रस्त्याकडे जाऊ शकतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *