Headlines

संभाजीनगरात पीएसआय, अंमलदार 5 हजार रुपये लाच घेताना जेरबंद:लेट नाइट अपडेट दोषारोपपत्र पाठवण्यासाठी लाच




खूनाच्या प्रयत्नात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुलाला मदत करून न्यायालयात लवकर दोषारोपपत्र पाठवण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक (पीएसआय) प्रशांत पासलकर व अंमलदार सुभाष राठोड यांना एसीबीने मंगळवारी रात्री रंगेहाथ पकडले. पासलकर याने महिलेकडे १५ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. पहिला हप्ता ५ हजार रुपये देताना एसीबीने ठाण्याच्या आवारातच सापळा रचला, अशी माहिती अधीक्षक माधुरी कांगणे यांनी दिली. मुकुंदवाडी ठाण्यात २ महिन्यांपूर्वी एका सहायक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक झाली होती. चष्मा काढताच झडप… लाच दिल्यानंतर तक्रारदार महिलेने ठरल्याप्रमाणे डोळ्यावरील चष्मा काढून हातात घेताच एसीबीच्या पथकाने झडप घालून दोघांना पकडले. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया व घराची झडती उशिरापर्यंत सुरू होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *