![]()
अवघ्या १० हजार रुपयांचे कर्ज न फेडल्याने एका आईनेच आपल्या १८ वर्षांच्या मुलीचे नकळत अश्लील फोटो व व्हिडिओ काढून सावकाराला पाठवले. आईच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना नागपुरात घडली. पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्
.
याप्रकरणी आई आणि सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमामवाडा परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेचे स्थानिक सावकाराकडील १० हजारांचे कर्ज थकले होते. त्यासाठी सावकाराने या महिलेकडे तगादा लावला. त्यावर तोडगा म्हणून आईने आपल्या तरुण मुलीला सावकाराकडे जाण्यासाठी दबाव टाकला होता.
कुणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी
हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुला जिवे मारेन किंवा स्वतःचे बरे-वाईट करून घेईन, अशी धमकीही आईने मुलीला दिली होती. आईकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने हिंमत दाखवली. तिने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी मुलीसह पोलिसांत फिर्याद दिली. सावकाराचा शोध सुरू आहे.