Headlines

एमपीएससी 2025 परीक्षापेपरची फेरतपासणी- सीएम:विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉन बैठकीनंतर निर्णय




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहाराविरुद्ध राज्यभरात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले. एमपीएससीच्या २०२५च्या परीक्षेतील केवळ गुणांची फेरबेरीज न करता संपूर्ण उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होईल. वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरपत्रिका माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) उपलब्ध करून दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ‘वर्षा’ बंगल्यावर विद्यार्थी संघटना प्रतिनिधींसोबत सलग पावणेदोन तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, औषधी निरीक्षकपदासह इतर पेपरफुटीची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. आठ दिवसांत ठोस कारवाई केली जाईल. यात दोषी बड्या अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही. मुख्य परीक्षेच्या फेरतपासणीचा निकाल लागेपर्यंत २१ तारखेपासून सुरू होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विद्यार्थी प्रतिनिधी महेश घरबुडे आणि पुणे स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत दळवी समिती शिफारशीनुसार गुणांचे सामान्यीकरण, मुख्य परीक्षेतील २ ते १४ गुणांची तफावत दूर करऱ्यावर चर्चा झाली. रोहित पवार म्हणाले की, एमपीएससी अध्यक्ष भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा १६ सप्टेंबरपासून मोठे आंदोलन करू. कारवाईनंतर एमपीएससी अध्यक्षपद आपोआप रिक्त होणार : आ. पाचपुते मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारे भाजप आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, चौकशीत दोषींवर कारवाई होताच एमपीएससी अध्यक्षपद आपोआप रिक्त होईल. आमदार रोहित पवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते थेट तपास यंत्रणांकडे द्यावेत. कारवाई झाली नाही तर मी लढायला तयार आहे. १२ तारखेपासून पुण्यातून सुधारणा समितीचा दौरा सुरू होत असून व्यवस्थेतील त्रुटी मुळापासून निपटून काढण्याचा सरकारचा निर्धार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिले. विद्यार्थी प्रतिनिधी महेश घरबुडे आणि पुणे स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत दळवी समिती शिफारशीनुसार गुणांचे सामान्यीकरण, मुख्य परीक्षेतील २ ते १४ गुणांची तफावत दूर करऱ्यावर चर्चा झाली. रोहित पवार म्हणाले की, एमपीएससी अध्यक्ष भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा १६ सप्टेंबरपासून मोठे आंदोलन करू.
आरटीआय निर्णयामुळे कारभारावर अंकुश आतापर्यंत ‘मॅट’च्या (महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण) निर्णयाचा दाखला देत आयोग उत्तरपत्रिका दाखवण्यास टाळाटाळ करत असे. मात्र, आता धोरणात्मक निर्णय झाल्याने परीक्षार्थीला आपले नेमके कुठे चुकले किंवा तपासणाऱ्याने कुठे पक्षपात केला, हे थेट पाहता येईल. यामुळे एमपीएससीच्या कारभारावर आपोआपच एक अप्रत्यक्ष अंकुश निर्माण होणार आहे. 1 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुणांची केवळ जुजबी फेरबेरीज नाही, तर संपूर्ण उत्तरपत्रिकांची फेरतपासणी.
2 पेपरफुटीसह गट-ब आणि गट-क परीक्षांमधील संशयास्पद निकालांची ‘एसआयटी’ चौकशी.
3 २१ तारखेपासून नियोजित सर्व मुलाखती फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत स्थगित.
4 यापुढे वर्णनात्मक उत्तरपत्रिका माहिती अधिकारात उपलब्ध
5 परीक्षा पद्धती, मुलाखतीचे गुण २७५ वरून १७५ करण्यासह दीर्घकालीन प्रशासकीय सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती दाैरा बड्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत औषधी निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी अटकेतील एमपीएससीचा अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकातेंसह संशयित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एसआयटी चौकशीनंतर कारवाईचे संकेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *