Headlines

कन्नड:उरूस मैदानावर पावसासाठी नमाज अदा




शहरातील सिद्धीक शाह बाबा दर्ग्यानजीकच्या उरूस मैदानावर शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५ हजार मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत पावसासाठी विशेष प्रार्थना केली. प्रतिनिधी | कन्नड कन्नड शहरातील सिद्दीक शहा बाबा दर्ग्यानजीकच्या उरूस मैदानावर शुक्रवारी पाच हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दमदार पावसासाठी विशेष ‘नमाजे इस्तेस्का’ अदा केली. निसर्गाची झालेली क्षती, वृक्षतोड किंवा आर्थिक शोषणाबद्दल अल्लाहने क्षमा करावी आणि पाऊस पाडून चारा-पाण्याची सोय करावी, अशी काकुळतीची प्रार्थना करण्यात आली. मौलाना रिजवान, मौलाना शकील, मौलाना असलम, मौलाना जावीद आणि मौलाना समीर यांनी पावसासाठी सामूहिक नमाज अदा करून दुवा मागितली. नगरसेवक अब्दुल जावेद सेठ मित्र मंडळ, रईस पल्सर मित्र मंडळ व सिद्दीक शहा बाबा उरूस समितीच्या वतीने या विशेष नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगरसेवक अब्दुल जावेद सेठ, हाजी शेखलाल, बाबा शेख, बुढन वस्ताद, मुन्ना रंगरेज, आबेद अहेमद अली, इलियास शेख, नगरसेवक अहेमद अली, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राठोड, विजय सिरसाठ आणि राजू शेख कमिटी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *