![]()
वाघाड येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा उपक्रम पार पडला. रामचंद्र मराठे व छाया मराठे यांनी आपले सुपुत्र स्वप्नील मराठे यांच्या नावे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले. एलिमेंटरी चित्रकला परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक, ड्रॉइंग पेपर, वॉटर कलर, ब्रश आणि पॅलेट यांसारखे कला साहित्य देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले. हे उपयुक्त साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी मुख्याध्यापिका सुजाता वाघ, उषा वडे, पांडुरंग बागुल, रोहिणी आवटे, सचिन वाघेरे आदी उपस्थित होते. मराठे कुटुंबाच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन व शिक्षकांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
Source link
दिंडोरी:वाघाड जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप