![]()
कै. गुरुवर्य पोट्ट्यन्ना बत्तीन यांनी समाजात रुजवलेल्या शैक्षणिक बीजांमुळेच माझ्यासारखी कन्या शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकली. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने मुलींच्या उच्च शिक्षणावर भर देऊन त्यांना स्वावलंबी केले पाहिजे. शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजात क्रांती घडवणारी शक्ती आहे, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी रायपेल्ली यांनी केले. कै. गुरुवर्य पोट्ट्यन्ना बत्तीन शैक्षणिक व सामाजिक मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सेवारत व सेवानिवृत्त शिक्षक तसेच २०२६ मधील पदवी, पदविका व पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दातरंगे मळा येथील श्री मार्कंडेय संकुलात उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा मंडळाचे अध्यक्ष नारायण चंद्रकांत मंगलारम होते. कार्यक्रमास माजी नायब तहसीलदार दत्तात्रय रायपेल्ली, प्रा. वीरभद्र बत्तीन, नितीन रायपेल्ली यांच्यासह समाजबांधव, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल देवदत्त गुंडू, मुख्याध्यापकपदी पदोन्नतीबद्दल साईगीता सब्बन आणि मंडळाला पाच हजार रुपयांची कायम ठेव देणाऱ्या रेखा बुरा यांचा विशेष गौरव झाला. मुख्याध्यापक संदीप छिंदम यांनी सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर विठ्ठलराव मंगलारम, सचिव श्रीनिवास एल्लाराम, उपाध्यक्ष सदाशिव बत्तीन, विनायक बत्तीन, सर्वश्री बाळकृष्ण सिद्धम, बाळकृष्ण गोटीपामुल, वीरभद्र बत्तीन, विठ्ठलराव गुंडू, कुमार आडेप, शेखर दिकोंडा, श्रीनिवास वंगारी,रघुनाथ गाजेंगी, शिवाजी संदूपटला, हनुमंत जोग, मारुती अरकल, साईगीता सब्बन, दत्तात्रय जोग, विजय येनगंदुल, शंकर बत्तीन, दत्तात्रय न्यालपेल्ली, विनायक भुसा, सागर सब्बन, नितिन गाली, बालकिसन आकुल यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक माजी अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम यांनी केले. शिक्षकांच्या यादीचे वाचन दत्तात्रय जोग तर विद्यार्थ्यांच्या नामावलीचे वाचन सहसचिव कृष्णा संभार यांनी केले. सूत्रसंचालन साईगीता सब्बन व गीता एल्लाराम यांनी, आभार माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल यांनी मानले, तर रेखा बुरा यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘एका पिढीचे शिक्षण, घडवते अनेक पिढ्यांचे भविष्य’ शंभर वर्षांपूर्वी गुरुवर्यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. गुरुवर्य हे पद्मशाली समाजातील पहिले अखिल भारतीय पदवीधर होते, तर आजच्या सत्कारमूर्ती साईलता सामलेटी या समाजातील पहिल्या शिक्षणाधिकारी ठरल्या आहेत. एका पिढीचे शिक्षण पुढील अनेक पिढ्यांचे भविष्य घडवते, म्हणूनच समाजाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज आहे, असे मंडळाचे अध्यक्ष मंगलारम यांनी सांगितले.
Source link
शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजात क्रांती घडवणारी शक्ती:शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी रायपेल्ली यांचे प्रतिपादन